अजित पवारांची डोकेदुखी वाढली; राष्ट्रवादीचे काम न करण्याचा भाजप युवा मोर्चाने का दिला इशारा?

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अमोल मिटकरींना आवरावे नाहीतर आम्ही इंदापूर आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमिका भाजप युवा मोर्चाने घेतली आहे. अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांचे बारामतीतून डिपॉझिट जप्त झालं होतं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.
भाजप युवा मोर्चाने दिला इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरी यांना आवर घालावी अन्यथा आम्ही बारामती आणि इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीचे महायुती म्हणून काम करणार नाही असा इशारा युवा मोर्चाचे वैभव सोलनकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांचे डिपॉझिट देखील जप्त केलं होतं. यावरुनच मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली होती. यावरून भाजप युवा मोर्चाने इशारा दिला आहे.





