satara | गोवंश वाहतूक करणाऱ्याला तालुक्यामधून हद्दपार करा

महाबळेश्वर, (प्रतिनिधी)– महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातून गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीरपणे गोवंश वाहतूक करणाऱ्या किरण चव्हाण याला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तालुक्यातील गोरक्षक कार्यकर्ते आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने गेल्या काही वर्षांपासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. मात्र, या कायद्याचे उल्लंघन करून किरण चव्हाण महाबळेश्वर तालुक्यातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. यापूर्वीही त्याच्यावर गोवंश वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
या कृत्यांमुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याला तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संजूबाबा ओंबळे, सनी मोरे, ओंकार पवार, विजय भाऊ नायडू, आनंद शिंदे, अविष्कार केळगणे,
मंगेश नाविलकर, किरण ढेबे, निलेश डोईफोडे, विनय गायकवाड, सचिन गुजर आणि बाळासाहेब पांचाळ यांच्यासह अनेक गोरक्षक आणि विविध पक्षसंघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.





