Pune District : श्री आदिवासी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Pune District : दिंडी प्रस्थानापूर्वी कोंढावळे व पौड येथे (कै.) सहदेव महाराज कंधारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भूगाव येथे दिंडीतील वाहनांचे पूजन करण्यात आले.

पिरंगुट : पुंडलिका वरदे, हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ भगवान की जय अशा जयघोषात मुळशी तालुक्यातील श्री आदिवासी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. तालुक्यातील विविध राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूगाव येथे दिंडीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
दिंडी प्रस्थानापूर्वी कोंढावळे व पौड येथे (कै.) सहदेव महाराज कंधारे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भूगाव येथे दिंडीतील वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, मिलिंद वाळंज, सविता दगडे, स्वाती हुलावळे, महादेव कोंढरे, रवींद्र कंधारे, उज्वला पिंगळे, कोमल वाशिवले, दगडूकाका करंजावणे, बाळासाहेब सणस, काजल मोरे, स्वाती ढमाले, गौरी भारतवंशी, सुनील वाडकर, सचिन अमराळे, सचिन खैरे, वैभव पवळे, लहू चव्हाण, जयवंत दहिभाते, अक्षय सातपुते, माउली डफळ, पुरुषोत्तम विटेकर, सीताराम तोंडे, बाळासाहेब आल्हाट, महेश गजरे, जयंत कंक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक मकरंद जोशी यांनी पंढरपूर येथील धर्मशाळेच्या इमारत बांधकामासाठी 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच संस्थेच्या माजी अध्यक्षा संगीता वाल्हेकर यांनी एक लाख रुपयांची देणगी देत धर्मशाळा उभारणीस हातभार लावला.
दिंडीतील वारकर्यांसाठी बाळासाहेब सणस, अशोक सणस व त्यांच्या सहकार्यांनी चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले. आंदेशे येथील सचिन कंधारे यांनी उपवासाचे साहित्य, तर मधुकर गावडे यांनी चितळे समूहाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. या सर्व दानशूरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मारुती कुंभार, नथू मिरकुटे, शिवाजी हुलावळे, सुनील वायकर, शशिकांत हुलावळे, दत्तात्रेय तारू, विष्णू खरुसे, प्रभाकर ढगे, सीताराम चव्हाण, अनंता कंधारे, भाऊ सोनवणे, अंकुश सोनवणे, अरुण शिंदे, संगीता वाल्हेकर आणि शकुंतला लांडगे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी केले.





