पुणे तांदळीत प्रथमच देवराई प्रकल्प ११८ प्रकारची वृक्षवल्ली

शिरूर : तांदळी (ता. शिरुर) येथील सदाशिव, महादेव, वामन, जयसिंग व रावसाहेब बापुराव कळसकर यांची आई (स्व) द्वारकाबाई बापुराव कळसकर यांच्या स्मरणार्थ तांदळी येथे भव्य देवराई प्रकल्पात वृक्षारोपण समारंभ पार पडला. हे वृक्षारोपण करण्याकामी रघुनाथ ढोणे यांच्या देवराई प्रकल्पाचे फार मोठे मार्गदर्शन व मदत मिळाली. तांदळी ग्रामपंचायतीचे देखिल वृक्ष लागवडीसाठी मोलाचे सहकार्य मिळाले.
गावातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व तांदळी ग्रामस्त यांनी देखील वृक्षारोपणास सहभाग घेतला होता. जागेत ११८ प्रकारची देशी, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली लावण्यात आल्या आहेत. प्रकल्पाने तांदळी गावच्या वैभवात भर पडली असून निसर्ग संवर्धनाच्या कामात नक्कीच हातभार लागला आहे.
शिरूर तालुक्यातील हा पहिलाच देवराईचा प्रकल्प अॅड .गणेश कळसकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला. वृक्षमित्र रवींद्र गोरे, तांदळी गावाचे वन अधिकारी महेश खोरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर व उपाध्यक्ष यमराज शिंदे यानीही विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गदादे, दिलीप सोनवणे, सावता गदादे, लहु खोरे, अमोल कळसकर, उपसरपंच सुभाष कळसकर, तांदळीचे पोलीस पाटील विशाल गदादे, माजी पोलीस पाटील पोपट निंबाळकर, रमेश साळुंखे, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.





