पिंपरी | पालिका मुख्यालयात पोहचला डेंग्यू

पिंपरी, (प्रतिनिधी)– पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयातील प्रशासन विभागातील तीन कर्मचार्यांना डेंग्युची लागण झाली आहे. एकाच विभागात शेजारी बसणारे हे कर्मचारी तापाने फणफणले असून, याची महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाला माहिती नव्हती. प्रसार माध्यम प्रतिनिधींनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तिसर्या मजल्यावर साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहर तापाने फणफणले आहे. बहुतांशी र्घात तापाचा एक तरी रुग्ण आढळत आहे. मात्र. महापालिका प्रशासनाकडून शहरात आतापर्यंत डेंग्यूचे केवळ 27 रुग्ण आढळले असल्याचे जाहीर केले आहे. तर खासगी दवाखाने व रुग्णालयांमध्ये तापावर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शहरातील खासगी प्रयोगशाळांमधील रक्तचाचणी अहवालाबाबत शंका उपस्थित करून, तो अहवाल नाकारला जात आहे. त्यामुळे डेंग्युची लागण झालेली रुग्णसंख्या कितीतरी पटीने अधिक असूनही, महापालिका दप्तरी ती केवळ 27 एवढी आहे.
शहरातील वाढत्या तापाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकार्यांनी स्वत:च्या घरातच स्वच्छता मोहीम राबविली. तर जनजागृतीकरिता लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. मात्र, मुख्यालयातील कर्मचार्यांनाच डेंग्यचू लागण झाल्याची बाब महापालिका प्रशासनाला माहिती नव्हती.
प्रशासन खडबडून जागे
महापलिका मुख्यालयाच्या तिसर्या मजल्यावर प्रशासन विभागातील तीन कर्मचार्यांना डेंग्यचूी लागण झाल्याची बाब प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी निदर्शनास आणुन देताच एकच खळबळ उडाली. तातडीने याची दखल गेत, संबंधित विभागाला तिसर्या मजल्यावर स्वच्छता मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मलेरिया, चिकुनगुणिया रुग्णसंख्या उपलब्ध नाही?
शहरात तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असताना केवळ डेंग्युची लागण झालेल्या रुग्णांची माहिती पालिका प्रशासनकडून उपलब्ध करुन दिली जात आहे. तर शहरात आढळलेल्या मलेरिया व चिकुनगुनियाने बाधित रुग्णसंख्येबाबत विचारणा करूनही याबातची माहिती दिली जात नाही.





