पोलिस आयुक्तालयाबाहेरील निदर्शकांना हटवले
Updated On:

नवी दिल्ली – जामियाच्या निर्दशकांवर एका युवकाकडून गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर तेथील काही विद्यार्थीही आक्रमक झाले होते व त्यांनी काल रात्रीपासून दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर धरणे धरले होते पण त्यांना आज शुक्रवारी सकाळी तेथून हलवण्यात आले.
या धरणे आंदोलनामुळे पोलिस मुख्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते काल पासूनच बंद करण्यात आले होते. या निदर्शकांवर कारवाई करण्याचा इशारा वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला होता पण त्याला न जुमानता हे विद्यार्थी निदर्शक तेथेच ठिय्या देऊन बसले होते. त्यामुळे दिल्लीच्या आधीच अस्थिर असलेल्या वातावरणात पुन्हा एक तणावाचे केंद्र तेथे निर्माण झाले होते. पण आज सकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून या निदर्शकांना तेथून हटवले आहे.





