कांदा निर्यातबंदीच्या विरोधात विधानभवनात विरोधकांची निदर्शने

नागपूर – कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज येथील विधानभवनात आंदोलन केले. विरोधकांनी कांद्याच्या एमएसपीमध्ये (किमान आधारभूत किंमत) वाढ करण्याची आणि हंगामी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली.
आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार भारताने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या आवारात निदर्शने करीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांद्याच्या प्रश्नांवर आणि विरोधकांच्या निदर्शनांवर बोलताना म्हणाले, “आम्ही गेल्या दीड वर्षात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्यांना १० ते १२ हजार कोटी रूपये दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमांपलिकडेही आम्ही शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.





