Pune District : बारामती ॲग्रोच्या दारात निदर्शने

बारामती : पारवडी येथे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या गेटच्या बाहेर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पारवडी गावातील ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित राखेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या संबंधित कारखान्यातील अधिकारी यांना कारखान्याच्या चिमणीमधून प्रदूषित राख बाहेर येत आहे. ती आजूबाजूला गावात पसरते. त्याचा लोकांच्या आरोग्यावर शेतीवर मोठा परिणाम होत आहे. या संदर्भातील उपाययोजना करावी,अशी मागणी केली.
यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली जात नाही. कारखान्याच्या गेट बाहेर आंदोलन करण्याची वेळ पारवडी ग्रामस्थांवर आली आहे. आंदोलनकर्ते तानाजी माळशिकारे म्हणाले की, आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रशासनाला पुढे घातले जात आहे.
या संदर्भातील लवकरात लवकर काही उपाययोजना नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड अमोल सातकर यांनी दिला. यावेळी नितीन पवार, विठ्ठल बेंगारे, बाबासाहेब पोंदकुले, शिंदे पोलीस पाटील, अनिल आटोळे, निलेश नगरे, शंकर गायकवाड, नितीन नांगरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





