“हाथरस’ प्रकरणी जनआधार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Updated On:

नगर – उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या घटनेचा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, वजीर सय्यद, गणेश निमसे, संतोष उदमले, शाहनवाझ शेख, अजय सोळंकी, बाळासाहेब केदारे, सुशिल साळवे, संतोष त्रिंबके, मयुर रोकडे, हरीभाऊ वाकचौरे, बाळासाहेब थोटे, सनी भोसले, कैलास मोरे, मुकेश हस, शाहबाज शेख, बाळासाहेब उद्मले आदी यावेळी उपस्थित होते. पीडीत कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.





