Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला अनेक आमदार-खासदारांकडून पाठिंबा मिळत आहेत. अनेकांनी त्यांची भेट देखील घेतली. यादरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली आहे. राज्याचे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी थेट भूमिका घेतली. विशेष म्हणजे आवताडे हे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे ते आमदार आहेत. समाधान आवताडे यांनी पत्रात काय लिहिले ? समाधान आवताडे यांनी दिलेल्या पत्रात लिहिले की, आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानासह मुंबई शहरामध्ये आंदोलनासाठी पुन्हा एकदा एकवटला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीप्रमाणे गरजवंत सकल मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे ही नम्र विनंती, असे आमदार समाधान महादेव आवताडे यांनी म्हटले आहे. Manoj Jarange | दरम्यान, मुंबईच्या वेशीवर मनोज जरांगे यांचा धडक मोर्चा दाखल झाल्यानंतर त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मुंबईत भगव वादळ दिसत आहे. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आझाद मैदान मराठा बांधवांनी पूर्णपणे भरले आहे. Manoj Jarange | हेही वाचा : आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये धक्का; बड्या नेत्याने सोडली केजरीवालांची साथ