श्रावणामुळे फळ बाजाराला बहार…

पुणे : सण-उत्सवाचा श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे फळांना मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने मोसंबीच्या भावात 10, कलिंगडच्या भावात किलोमागे 2 रुपये, खरबूज आणि पपईच्या भावात प्रतिकिलोमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे.
मागणी नसल्याने सिताफळ, डाळिंबाच्या भावात 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 2 ट्रक, मोसंबी 30 ते 35 टन, संत्री 2 ते अडीच टन, डाळिंब 80 ते 100 टन, पपई 25 ते 30 टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू 450 ते 500 क्रेटस्, चिक्कू 300 गोणी, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, सिताफळ 10 टन, खरबुजाची 4 ते 5 टेम्पो आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : 60-120, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-460, (4 डझन ) : 50-130, संत्रा : (3 डझन) : 250-400, (4 डझन ) : 120-150, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 20-80, गणेश : 5-20, आरक्ता 10-40. कलिंगड : 5-10, खरबुज : 10-30, पपई : 5-20, चिक्कू : 100-600, पेरू : 150-400, सिताफळ : 10-90.





