Nagar | भूमीहीनांना सरकारी जमीन वाटपाची मागणी

नगर, (प्रतिनिधी) – दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी व राहते घरे त्यांच्या नावावर करावे, भूमीहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे व दलित, आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात दलित, आदिवासी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बहुजन समाज पक्षाचा महापालिका येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.
हक्काची जागा, कसण्यासाठी शेतजमीन व घरे मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करुन दलित आदिवासी समाजातील पुरुष व महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता प्रवेशद्वार समोर निदर्शने ठिय्या आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ,
श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष विठ्ठल म्हस्के, उपाध्यक्ष कानिफनाथ बर्डे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, गणेश बागल,
शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, बाळासाहेब काते, संजय संसारे, मोहन काळे, छबू मोरे, रोहित साळवे, रतन पवार, त्रिंबक साळवे, हौसराव गोरे, विलास माळी,
अर्जून उल्हारे, अजित भोसले, छबू चव्हाण, संतोष भोसले, गोरक्षनाथ पवार, कैलास कोळगे, साहेबराव मनतोडे, सनी पवार, महादेव गायकवाड, विजू बर्डे, संजय जगताप, अमजत शेख आदी सहभागी झाले होते.
दलित, आदिवासी समाज आजही उपेक्षितपणाचे जीवन जगत आहे. शासकीय योजना फक्त कागदोपत्री रंगवल्या जात असून, हा समाज आजही न्यायापासून वंचित आहे. गुन्हेगारीचा शिक्का मारुन या समाजावर एकप्रकारे अन्याय सुरु आहे.
या समाजाला राहण्यासाठी घरे नाही, कसण्यासाठी जमीन नाही. ज्या सरकारी ते राहत आहे, त्या जागा खाली करण्यासाठी देखील सुपाऱ्या घेऊन त्यांच्यावर अन्याय सुरु आहे.
अनेक वर्षापासून त्यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी जमिनी व राहते घरे त्यांच्या नावावर करण्याची गरज आहे. -सुनिल ओहोळ जिल्हा प्रभारी, बसपा



