Maharashtra Assembly Election 2024 – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या दारूचे आकडे डोळे फिरविणारे आहेत. यंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रेकॉर्डब्रेक दारू जप्त केली. गेल्या 30-35 वर्षांत यंदा पहिल्याच ‘एक्साइज’च्या हाती ३६ दिवसांत तब्बल 39 कोटी 67 लाख रुपयांची दारु जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूची किंमत तब्बल 39 कोटी 67 लाख रुपये इतकी आहे. यात विदेशी दारू 1 लाख 13 हजार लिटर इतकी होती. हातभट्टीची दारू 2 लाख 20 हजार लिटर इतकी होती. गावठी दारूसाठीचा माल – 24 लाख 75 हजार लिटर,स्पिरीट – 44 हजार 300 लिटर, ताडी – 33 हजार लिटर,भांग – 3 हजार किलो, परराज्यातील दारू – 41 हजार लिटर इतकी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यानंतर आपल्याला 2024 च्या निवडणुकीत कसा दारूचा महापूर सुरू आहे याचा अंदाज आपल्याला येईल. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 13 कोटी 37 लाख रुपयांची दारू एक्साईज विभागाने जप्त केली होती. तर नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 75 दिवसांच्या आचारसंहितेच्या काळात तब्बल 37 कोटी 64 लाख रुपयांची दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली होती.