Delimitation Bill : “पवारांचा इतिहास हा खंजीर खुपसणारा, केवळ सत्तेसाठी जन्माला आले आणि…”; विजय वडेट्टीवारांची टीका
Delimitation Bill : "देशात हुकुमशाही आणण्यासाठीच हे डिलीमेटशन बिल आणण्यात येतयं"

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे मानले जात आहे. तसेच पवार गटाकडून इंडिया आघाडीच्या बैठकीला कुणीही जाणार नसल्याचे वृत्तही समोर येत आहे. याचदरम्यान आता काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘पवारांचा इतिहास हा खंजीर खुपसणारा’ (Delimitation Bill)
‘दोघांनी मिळून घरात हा निर्णय घेतला’ (Delimitation Bill)
विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवारांचं वय आता ८६ वर्षे आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा नेत्यांकडून जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी केली जात आहे. ते देश उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीसोबत हातमिळवणी करून त्यांच्यासोबत जातील असं कधीच वाटलं नव्हतं. पण पवारांचा इतिहास हा खंजीर खुपसणारा आहे, हेही महाराष्ट्राला आणि देशातील लोकांना माहित आहे.”
“राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष केवळ सत्तेसाठी बनला आहे, सत्तेशिवाय जगणं, या पक्षाला मान्य नाही. ‘जल विना मछली’, अशी त्यांची परिस्थिती आहे. यांना कुठलाही विचार नाही, हे आता सिद्ध झालं आहे. आम्ही सर्वांनी मिळून पवारांना ८५ व्या वर्षी देखील पाठिंबा देत त्यांना राज्यसभेवर पाठवलं. कारण शाहू फुले आंबेडकरांचा विचार पवारांच्या माध्यमातून टिकला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं. मात्र त्यांनीच तो विचार संपवण्याचं काम केलं”, अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Delimitation Bill : “पवारांचा इतिहास हा खंजीर खुपसणारा, केवळ सत्तेसाठी जन्माला आले आणि…”; विजय वडेट्टीवारांची टीका
“डिलीमेटशननंतर उद्या संविधान संपेल, लोकशाही संपेल, निवडणुका होणार नाहीत. देशात हुकुमशाही आणण्यासाठीच हे डिलीमेटशन बिल आणण्यात येत आहे, असं आमचं मत आहे,” अशी भावना वडेट्टीवारांनी व्यक्त केली.
पुढे विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “सुप्रिया सुळेंना सत्तेत जायचं आहे, त्यांना मंत्री व्हायचं आहे. हे आधीपासून आम्हाला माहीत होतं. त्यामुळे या लोकांना आता विचारच राहिला नाही, हे केवळ सत्तेसाठी जन्माला आलेत आणि सत्ता घेऊन मरायचं, एवढंच याच्या डोक्यात आहे, हे आता दिसतंय. आजही दोन्ही बापलेक हा निर्णय घेतात. त्यामुळे एकाने हा निर्णय घेतला आणि दुसऱ्याने मान्य केला असं नाही, दोघांनी मिळून घरात हा निर्णय घेतला आहे, असं मला वाटतं.”
“केवळ 10 आमदारांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद मागणे हे हास्यास्पद आहे. भाजपने शिंदे गटाकडे 60 आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. पण सुप्रिया सुळे डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असतील म्हणून त्यांना भाजप मुख्यमंत्री बनवणार असेल तर आनंद आहे,” असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा:





