Delimitation Bill : ‘पवारांनी राज्यसभेच्या जागेचं तूप खाल्लं, ठाकरेंनी…’; भाजपचा बोचरा वार, पोस्ट व्हायरल
Delimitation Bill : या पोस्टमध्ये शरद पवारांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठिवण्यासाठी काय केले याची आठवण करून दिली आहे.

Delimitation Bill : एनडीएकडून संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या विधेयकासाठी एनडीएला विरोधी पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्याची गरज असून त्यादृष्टीने मोठ्या घडामोडी पडद्याआडून सुरू आहेत. महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या विधेयकासंदर्भात स्पष्टपणे भूमिका जाहीर केली नसली तर डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा निश्चित मानला जात असून, यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसने एक पोस्ट एक्सवरुन शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये शरद पवारांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठिवण्यासाठी काय केले याची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनंतर भाजपकडून तिखट शब्दांत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. पवारांनी राज्यसभेच्या जागेचं तूप खाल्लं, ठाकरेंनी विधानपरिषदेच्या जागेचं तेल पळवलं आणि काँग्रेसच्या हातात मात्र धुपाटणं! अशा शब्दांत काँग्रेसवर बोचरा वार करण्यात आला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात एक्सवरुन ट्वीट केले आहे.
मविआचा अखेर खेळ खल्लास! मविआ म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.
हेच गाजर दाखवत आघाडीतला मलिदा दोघांनी खाल्ला आणि काँग्रेसच्या हाती मात्र धुपाटणं आलं!
पवारांनी राज्यसभेच्या जागेचं तूप खाल्लं, ठाकरेंनी विधानपरिषदेच्या जागेचं तेल पळवलं आणि काँग्रेसच्या हातात मात्र धुपाटणं!
विचारांची एकजूट नाही, विचारधारेचा समान धागा नाही; आहे तो फक्त सत्तेचा स्वार्थ! अशा आघाड्यांचा शेवट यापेक्षा वेगळा काय असणार?
दोघांनी मलिदा खाल्ला, काँग्रेसच्या वाट्याला मात्र धुपाटणं आलं!
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@RahulGandhi
@PawarSpeaks
@uddhavthackeray#DelimitationBill #Delimitation
#मविआ #काँग्रेस #राजकीयसाठमारी #महाराष्ट्रराजकारण #MVA #PoliticalDrama— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 28, 2026
पोस्टमध्ये, विचारांची एकजूट नाही, विचारधारेचा समान धागा नाही; आहे तो फक्त सत्तेचा स्वार्थ! अशा आघाड्यांचा शेवट यापेक्षा वेगळा काय असणार? दोघांनी मलिदा खाल्ला, काँग्रेसच्या वाट्याला मात्र धुपाटणं आलं! अशा तिखट शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.
नेमकी काय आहे पोस्ट?
मविआचा अखेर खेळ खल्लास! मविआ म्हणजे गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. हेच गाजर दाखवत आघाडीतला मलिदा दोघांनी खाल्ला आणि काँग्रेसच्या हाती मात्र धुपाटणं आलं! पवारांनी राज्यसभेच्या जागेचं तूप खाल्लं, ठाकरेंनी विधानपरिषदेच्या जागेचं तेल पळवलं आणि काँग्रेसच्या हातात मात्र धुपाटणं! विचारांची एकजूट नाही, विचारधारेचा समान धागा नाही; आहे तो फक्त सत्तेचा स्वार्थ! अशा आघाड्यांचा शेवट यापेक्षा वेगळा काय असणार? दोघांनी मलिदा खाल्ला, काँग्रेसच्या वाट्याला मात्र धुपाटणं आलं!
शरद पवारांसाठी काँग्रेसने काय पोस्ट केली?
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली, अशी आठवण काँग्रेसने शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची पोस्टमधून सांगितली आहे.
आघाडीत फूट
आता प्रश्न उरतो की काँग्रेस काय भूमिका घेणार? तर काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शवलेला नाही. जर निर्णय होत असेल तर ठीक आहे; पण त्यात अन्याय होत असेल तर काँग्रेस विरोध दर्शवेल अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे या विधेयकावर आघाडीत फूट पडल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. आता संसदेच्या विशेष अधिवेशनात नेमकं काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






