12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’
Updated On:

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध उद्यान असलेले राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले असून त्याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रपती भवनातीत हे गार्डन बंद ठेवण्यात आले होते.
राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीस केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वार्षिक राष्ट्रपती भवन उद्यानोत्सव – मुघल गार्डन 12 फेब्रुवारी ते 16 मार्च (सोमवार वगळता) सर्वसामान्यांसाठी खुले असेल. त्यामुळे येत्या 12 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुघल गार्डन खुले होणार आहे. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मुघल गार्डन खुले करण्याचा निर्णय राष्ट्रपती भवनाकडून घेण्यात आला आहे.





