Delhi excise policy case : सिसोदियांच्या पाठीमागे आता ईडीची चौकशी

नवी दिल्ली – गेले काही दिवस सीबीआयच्या कोठडीत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कालच तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली असून आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन चौकशी केली.
उत्पादन शुल्क धोरणातील गैरव्यवहार व त्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या मनीलॉंड्रिंग प्रकरणात त्यांची ही चौकशी ईडीकडून सुरू आहे. ईडीने त्यांना या प्रकरणात आज आणखी एकाला हैदराबाद येथून ताब्यात घेतले आहे. अरुण रामचंद्र पिल्लाई असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/aaps-manish-sisodia-sent-to-judicial-custody-till-march-20/
सिसोदिया यांना 26 तारखेला अटक करण्यात आली असून त्यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची तिहार कारागृहात जाऊन चौकशी करण्याची अनुमती ईडीने कोर्टातून घेतली आहे. ईडीने म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपींनी फोन कॉल व अन्य पुरावे नष्ट केले आहेत.





