Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीत निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, भाजपचे 22 आणि आपचे 9 ‘रोड शो’

Delhi Assembly Elections 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार आहे. शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात सर्व ताकद पणाला लावली आहे. भारतीय जनता पक्ष सोमवारी दिल्लीत 22 रोड शो करत आहे, तर आम आदमी पार्टीच्या 9 रॅली आहेत.
केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah की 3 फरवरी, 2025 को दिल्ली में जनसभाएं।
लाइव देखें :
📺https://t.co/OaPd6HRrq3
📺https://t.co/vpP0MIos7C
📺https://t.co/lcXkSnOnsV
📺https://t.co/4XQ2GzrhRl pic.twitter.com/nH432TpwF7— BJP (@BJP4India) February 2, 2025
अमित शहा यांचा रोड शो –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज दिल्लीत तीन सभा होत आहेत. त्यांची पहिली जाहीर सभा जंगपुरा, दुसरी बिजवासन आणि तिसरी द्वारका विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने ते जनतेला संबोधित करणार आहेत.
जेपी नड्डा यांची जाहीर सभा –
दिल्ली निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचीही मोठी जाहीर सभा आहे. ईशान्य दिल्लीतील बुरारी येथील मुकुंदपूर चौकात ते जनतेला संबोधित करतील. सोमवारी दिल्लीत भाजपच्या एकूण 22 रॅली होणार आहेत.
आम आदमी पार्टी के राष्ट्रीय संयोजक @ArvindKejriwal जी के आज होने वाले कार्यक्रम🙌
फिर लायेंगे केजरीवाल 🧹💯 pic.twitter.com/pZ2FGZHZl1
— AAP (@AamAadmiParty) February 3, 2025
अरविंद केजरीवाल यांचा रोड शो –
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल कालकाजी येथे मुख्यमंत्री आतिशी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेत आहेत. याआधी छतरपूरमध्ये सभा घेतली.
सीएम मान यांच्या सभा –
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीत 4 जाहीर सभा घेत आहेत. आदर्श नगर, शालिमार बाग, शकूर बस्ती आणि वजीरपूर येथे त्यांच्या सभा होत आहेत.
संजय सिंह यांचा कार्यक्रम –
राज्यसभा खासदार आणि आप नेते संजय सिंह तीन जाहीर सभा घेणार आहेत. त्यांचा पहिला रोड शो रिठाळा येथे होणार असून त्यांची दुसरी व तिसरी जाहीर सभा अनुक्रमे बवाना व किरारी येथे होणार आहे.





