नवी दिल्ली – इस्रायली दुतावासाजवळ अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. परंतु, आता याच ठिकाणी पोलिसांना एका चिठ्ठीही मिळली आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशाराही चिठ्ठीत देण्यात आल्याचे समजत आहे. या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे.
Delhi: A crime investigation team of Delhi Police visits the spot where a low-intensity explosion occurred near Israel Embassy on Jan 29. pic.twitter.com/r73muMIUKC
— ANI (@ANI) January 30, 2021
कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. यामध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तेथे पायी जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे.
बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना साहित्य मिळाले असून यात एक पाकीट सापडले. यामध्ये एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, इस्रायली दुतावासाजवळ अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता फार मोठी नव्हती. त्यात कोणीही जखमी झाले नाही. प्राथमिक तपासात हा रस्ता दुभाजकावरील फ्लॉवर पॉटमध्ये हा बॉम्ब पेरण्यात आला होता. रस्ताच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या तीन मोटारीच्या काचा त्यामुळे फुटल्या.