#Prokabaddi2019 : दबंग दिल्लीकडून जयपूर पिंकपॅंथर्सचा पराभव

पाटणा – प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील अन्य सामन्यात दबंग दिल्लीने जयपूर पिंकपॅंथर्सला 35-24 असे पराभूत करीत साखळी गटात आघाडीस्थान घेतले.
दिल्ली संघाने जयपूरविरुद्ध सुरेख सांघिक कौशल्य दाखविले. त्याच्या जोरावर त्यांनी मध्यंतराला 17-10 अशी आघाडी मिळविली होती. तेथेच त्यांनी विजयाचा पाया रचला गेला. उत्तरार्धातही त्यांनी खोलवर चढाया करीत सामन्यावरील पकड मजबूत केली.
जयपूरच्या दीपक हुडा व दीपक नरवाल यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य खेळाडूंकडून अपेक्षेइतका प्रभावी खेळ झाला नाही. त्यामुळेच त्यांना हाराकिरी पत्करावी लागली. दिल्लीच्या नवीनकुमार (12) व रणजित चंद्रन (10) यांनी सुपरटेनची कामगिरी करीत संघाच्या विजयात उल्लेखनीय वाटा उचलला. जयपूरच्या हुडाने 11 गुण मिळविले तर नरवालने 5 गुणांची कमाई केली. साखळी गटात दिल्लीने पाच सामन्यांमध्ये 21 गुणांची कमाई केली आहे तर जयपूरचे 20 गुण आहेत.





