Dehu News : देहू नगरपंचायतीतील सदस्य पदाची आज निवडणूक
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
देहूगाव – देहू नगरपंचायतीतील रिक्त असलेल्या नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) पदासाठीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी (दि. १०) पार पडणार आहे. ही निवडणुक प्रक्रिया हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.नामनिर्देशित सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी (दि. १०) सकाळी १० ते १२ दरम्यान मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याकडे अर्ज सादर करावेत. त्यानंतर दुपारी एक वाजता अर्जांची छाननी करण्यात येईल. छाननीनंतर पात्र उमेदवारांमधून निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर निवड झालेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.





