संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करोनाचा लागण; ‘या’ कार्यक्रमात होणार होते सहभागी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले येत आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.त्यानुसार ते सध्या अराम करत असल्याचे म्हटले जात आहे.
राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये झालेल्या कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. दुसरीकडे, राजनाथ सिंह आज 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आज या परिषदेत सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, देशभरात एका दिवसात तब्बल 12,591 नवीन करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे.
गेल्या आठ महिन्यांत समोर आलेली ही सर्वाधिक रोजची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.





