प्रभू श्रीराम मंदिर अयोध्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘रुद्रांग’कडून दीपोत्सवाचे आयोजन
Updated On:

प्रभू श्रीराम मंदिर अयोध्याच्या वर्षपूर्तीच्या पवित्र शुभ मुहूर्तावर आज रुद्रांगकडून गुजर निंबाळकर वाडी येथील ममता फाउंडेशन येथे छोटेखानी दीपोत्सव करण्यात आला. येथील सर्व मुले अनाथ असून एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. येथे 22 विशेष मुले मुली वास्तव्यास असून त्यांच्यासोबत या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रुद्रांगकडून या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच मुलांसोबत दीपोत्सव साजरा करत फटाके सुद्धा वाजवण्यात आले. विशेष म्हणजे येथील काही मुले आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, तर काही जण कामही करत आहेत. यापूर्वी देखील रुद्रांगकडून येथे कविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.





