दीपिका पदुकोणने ‘द व्हाइट लोटस’चा तिसरा सीझन करण्यास दिला नकार

Deepika Padukone| अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दीपिका पादुकोन सप्टेंबर महिन्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
त्यानंतर आता प्रेग्नेंसीमुळे दीपिकाने इंटनॅशनल वेब सीरिज ‘द व्हाइट लोटस’ च्या तिसऱ्या सीझनला देखील नकार दिला असल्याचे म्हंटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाची काळजी घेण्यासाठी अभिनेत्रीने सीरिझला नकार दिला आहे. याशिवाय दीपिकाने अनेक प्रोजेक्ट करण्यास नकार दिला असल्याचेही सांगितले जात आहे.
दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांनी मार्च महिन्यात प्रेग्नेंसी अधिकृत घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. एक खास पोस्ट शेअर करत दोघांनी आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. शिवाय अनेक ठिकाणी दीपिका बेबी बम्प देखील फ्लॉन्ट करताना दिसली.
सोशल मीडियावर देखील तिने तिचे अनेक फोटो शेअर केले होते. दीपिका प्रसूतीनंतर अधिक वेळ बाळासाठी देणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे तिने ‘द व्हाइट लोटस’ च्या तिसऱ्या सीझनच्या ऑफरला देखील नकार दिला आहे.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दीपिका पदुकोण पहिल्यांदाच प्रभाससोबत दिसली आहे. अमिताभ बच्चन, दिशा पटानी आणि कमल हासन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय दीपिका लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा:
BSNL चा ‘हा’ पोस्ट पेड प्लान VI, Jio आणि Airtel पेक्षा आहे ‘स्वस्त’





