Deepika Padukone : ‘अरे ही तर झोमॅटो गर्ल…’, एअरपोर्ट लूकमुळे दीपिका झाली पुन्हा ट्रोल

मुंबई – 9 नोव्हेंबर 2007 रोजी अभिनेता शाहरुख खानसोबत सिनेसृष्टीतील पाऊल टाकणारी बॉलीवूडमधील फ्रॅंट रनर आणि स्टाइल आयकॉन अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ने लौकिकार्थाने आतापर्यंत बरेच यश कमावले आहे. दीपिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलवर्स आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी दीपिका सध्या तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. नुकतंच इंस्टाग्रामवर दीपिकाचा एक व्हिडिओ व्हिडिओ झाला असून, यामध्ये ती एअरपोर्ट असल्याचे दिसून येत आहे. यावेळी दीपिकाने संपूर्ण लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. लाल रंगाची स्किनी पँट, हायनेक- थ्री फोर्थ स्लिव्ह असणारं लाल रंगाचं टी-शर्ट असे कपडे तिने परिधान केले होते.
या लूकची शोभा वाढवण्यासाठी तिने लाल रंगाची टोपी आणि फुटवेअरही कॅरी केले होते. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा लूक पसंतीस पडलेला दिसत नाही. आणि याच वरून दीपिका नेटकऱ्यांची शिकार झाली. ‘हिला पँट घालायची होती की प्लास्टिक, हे प्लास्टिक का? असा सवाल ट्रोलर्सने उपस्थित केला. तर काहींनी तिच्या या फॅशन सेन्सला रणवीरचाच परिणाम असल्याचेही म्हटले. तर काही नेटकऱ्यांनी तिला ‘झोमॅटो गर्ल’ म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला असून, यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे सर्व लीड रोल मध्ये आहेत. या चित्रपटातील काही किसिंग सीन्स मुळे देखील दीपिका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.





