Deepika Padukone: “रक्ताचं नातं नाही, पण मनाने भाऊ, दीपिकाची जलाल सोबतची खास राखी”

Deepika Padukone: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला जन्मतः सख्खा भाऊ नाही. मात्र, रक्षाबंधनासारख्या भावनिक आणि पारंपरिक सणाच्या दिवशी त्या आपल्या खास ‘राखीभाऊ’ला राखी बांधतात. आश्चर्याची बाब म्हणजे हा भाऊ म्हणजे तिचा अनेक वर्षांचा विश्वासू बॉडीगार्ड जलाल.
जलाल हे अनेक वर्षांपासून दीपिकाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत. देशांतर्गत शूटिंग असो किंवा परदेशातील कार्यक्रम, जलाल नेहमी तिच्यासोबत असतात. या काळात त्यांच्या आणि दीपिकाच्या नात्यात एक अनोखी आत्मीयता निर्माण झाली आहे. केवळ कामापुरते नाते न ठेवता जलाल कुटुंबाचा एक भाग झाले आहेत.
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी दीपिका आपल्या या खास भावाला राखी बांधून त्याच्याविषयीचा स्नेह व्यक्त करते. हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वास, काळजी आणि जिव्हाळ्यावर उभे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाच्या सुरक्षेसाठी जलाल यांना वार्षिक 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत पगार मिळतो, जो काही मोठ्या कंपन्यांच्या सीईओंपेक्षाही जास्त आहे. त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसोबतच प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे ते दीपिकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनले आहेत.
सिनेमाच्या जगतातील ग्लॅमर, व्यस्त वेळापत्रक आणि सततच्या प्रवासात सुरक्षिततेची गरज असते. अशा परिस्थितीत जलाल केवळ अंगरक्षक न राहता, बहिणीच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेणारा खरा भाऊ ठरतो. दीपिकाही या भावनिक नात्याला प्रत्येक रक्षाबंधनाला राखी बांधून जपते.





