दीपिका कक्कडने हातावर गोंदवले शोइकाचे नाव

अभिनेत्री दीपिका कक्कड अलीकडेच पती शोएब इब्राहिमबरोबर गोव्याच्या ट्रीपवर गेली होती. दोघांनी खूप फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये दीपिकाच्या हातावरचा एक टॅटू स्पष्ट दिसतो आहे. दीपिकाने “शोइका’ असे नाव आपल्या डाव्या हातावर गोंदवलेले दिसते आहे.
View this post on Instagram
“शोइका’ हे नाव शोएब आणि दीपिकाच्या नावाच्या एकत्रीकरणातून निर्माण झाले आहे. हा टॅटू तात्पुरता आहे की कायमस्वरूपी आहे, हे समजू शकलेले नाही. हा फोटो शेअर करताना दीपिकाने “माझ्या आयुष्यातील सर्व आनंदाचे कारण’ अशी कॅप्शन दिली आहे.
View this post on Instagram
दीपिकाला काही दिवसांपूर्वीच यू-ट्युबवर 10 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. यामुळे दीपिकाला यू-ट्युबकडून गोल्ड प्ले बटन रिवॉर्ड मिळाला आहे. याच्या आनंदाप्रित्यर्थ शोएबने दीपिकाला एक पार्टी दिली होती. दीपिकाने याच वर्षी आपले यू-ट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवर ती अनेक मजेदार व्हिडिओ शेअर करत असते.
View this post on Instagram
तिच्या या कामगिरीचे कौतुक करतना शोएबने ही गोव्याची पार्टी दिली होती. याची बातमी अर्थात “गुड न्यूज’ देण्याविषयी दीपिकाने पोस्ट केली होती. पण तिच्या फॅन्सना वेगळ्याच “गुड न्यूज’ची शंका आली होती.
View this post on Instagram





