Satara: दीपक माळी यांची शिरवळ मुलींच्या शाळेस भेट, ‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत आयोजन
Satara स्पर्धा परीक्षांमधील सातत्यपूर्ण यश, कोडींगमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व यश, सीएसआर पाच कोटींच्या वर, पटाचा चढता आलेख, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतील यश, परदेशी व भारतीय राज्य भाषांच्या ओळखीचा नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास याबद्दल माळी यांनी समाधान व्यक्त केले.

Satara: ‘चला जाऊया शाळेत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिव दीपक माळी यांनी शिरवळ (ता. खंडाळा) येथील मुलींच्या शाळेस भेट देऊन, गुणवत्तापूर्ण विकासासाठी राबवण्यात आलेल्या उकप्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी डाएटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, फरांदे, रमेश कोरे, अभिनव भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी उर्मिला पवार, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच राहुल तांबे, ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समितीच्या शिक्षण प्रतिनिधी सौ. गिरे, एसएमसी अध्यक्ष बोडरे, उज्ज्वला साळुंखे, दास, लोखंडे, विशाल शेटे, राहुल यादव, रवींद्र लेंभे, मुजमुले उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षांमधील सातत्यपूर्ण यश, कोडींगमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व यश, सीएसआर पाच कोटींच्या वर, पटाचा चढता आलेख, व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतील यश, परदेशी व भारतीय राज्य भाषांच्या ओळखीचा नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास याबद्दल माळी यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, खंडाळा पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया जाधव, माजी सभापती राजेंद्र तांबे यांनीही शाळेतील उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.





