Deepak kesarkar – Dada Bhuse । महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातुन शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांनतर शिक्षणमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी घेतलेले निर्णय आता हळूहळू बदलण्यात येत असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याविषयीची नाराजी केसरकरांनी बोलून देखील दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयावर फेरविचार Deepak kesarkar – Dada Bhuse । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. शालेय गणवेश वाटपाच्या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पुस्तकाला वह्याचीपाने जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार सुरू झाला आहे. सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र, ज्याप्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत, हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे. चर्चा करून शालेय निर्णय जारी करण्यात येणार Deepak kesarkar – Dada Bhuse । पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्याप्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची, तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे.नवे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे, दीपक केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करुन ते रद्द होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा “तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न”; छगन भुजबळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया