“तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न”; छगन भुजबळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal And DCM Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी समीर भुजबळ देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
या भेटीनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. “या भेटीत फडणवीस यांच्याशी सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मला 8 ते 10 दिवसांचा वेळ द्या, आपण शांततेने मार्ग काढू, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल,” असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना अजित पवार यांनी तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असे म्हणत त्यावर बोलणे टाळले.
पुण्यातील वाहतूक कोंडीवर भाष्य
यावेळी अजित पवारांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर भाष्य केले. वाहतूक कोंडीवर 15 दिवसांनी बैठक घेणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यावर सर्व विभागांची बैठक आयोजित केली आहे. पुण्यातील केईम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे. त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करुन देईल, असं अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा:





