दीपा मलिक भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी

नवी दिल्ली : पॅरालिंपिकमधील भारताच्या एकमेव पदकविजेत्या महिला खेळाडू दीपा मलिक यांची शुक्रवारी बेंगळुरूमध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पण या निवडणुकीसंबंधीचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट अाहे. त्याच्या निकालानंतरच मलिक यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल.
Congratulations for all new @ParalympicIndia Executive Board Members – Election Results of Office Bearers & Executive Board pic.twitter.com/RrivUA1iWv
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) February 1, 2020
या समितीमध्ये गुरशरण सिंह यांची महासचिवपदी, कविंदर चौधरी आणि शशि रंजन यांची उपाध्यक्षपदी तर एम महादेवा यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाले नंदकिशोर बाबूराव आणि कांतिलाल परमार यांची सहसचिवपदी निवड झाली आहे.
दरम्यान, ४९ वर्षीय दीपा मलिक यांनी साल २०१६ च्या रिओ आॅलिंपिकमध्ये गोळाफेक प्रकारात एफ-५३ गटात रौप्यपदक पटकावले होते.





