Mithun Charkaborty : ‘कुटुंबीय आणि चाहत्यांना पुरस्कार समर्पित…’; दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मिथुन च्रकवर्ती झाले भावुक

Mithun Charkaborty | Dadasaheb Phalke Award – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारा जाहीर झाला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना समर्पित केला.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले जेंव्हा मी मुंबईत आलो होतो तेंव्हा मला काही खायला नव्हते. तेंव्हा मी एका कारमध्ये झोपलो होतो आणि त्यानंतर मी खूप घाबरलो होतो. मी फक्त एवढेच सांगू शकतो की मी हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला आणि आपल्या देशासाठी आनंदाचे क्षण आणणाऱ्या जगभरातील चाहत्यांना समर्पित करतो.
मी 76 चित्रपट केले आहेत. तुम्हाला माहिती आहे की, मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला आहे, परंतु काहीवेळा त्याचे परिणाम समोर येतात आणि तुम्ही सर्व वेदना विसरतात. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी १९६९ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
पृथ्वीराज कपूर, विनोद खन्ना, राज कपूर, शशी कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले, बीआर चोप्रा आणि यश चोप्रा यांसारख्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे. वहिदा रहमान यांना 2021 मध्ये हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला.
दरम्यान, अभिनेत्री जया प्रदा यांनी मिथुन दा यांना पुरस्कार मिळणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. जया प्रदा म्हणाल्या, चित्रपट क्षेत्रातील आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण मिथुन दा हे महानायक आहेत. त्यांनी अनेक भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. माझ्यासाठी हे खूप खास आहे.
आम्ही दोन आगामी चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत असल्याचा खूपच आनंद आहे. आम्ही रिवाज आणि दुसरा चित्रपट फौजी देखील पूर्ण केला आहे, ज्यामध्ये मी दादा (मिथुन चक्रवर्ती) आणि प्रभाससोबत स्क्रीन शेअर करत आहे.





