पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; अन् आरोपीच्या अनधिकृत दुकानावर पालिकेची थेट कारवाई, निलेश राणेंचा इशारा

Ind vs Pak Match | चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना रविवारी झाला. भारताने हा सामना एकहाती जिंकत भारतीयांची मने जिंकली. या सामन्यानंतर सिंधुदुर्गमध्ये भारताविरोधी घोषणा दिल्याचे समोर आले. एका भंगार व्यावसायिकाने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ट्विट करुन संबंधित भंगार व्यावसायिकाने भारत-पाकिस्तान सामन्यातील विजयानंतर अशा घोषणा दिल्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर पालिकेने संबंधितावर कारवाईही केली आहे.
शिवसेना आमदार निलेश राणे आणि प्रशासनाने या भंगारवाल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. जेसीबीने मालवण शहरातील आडवण येथील भंगारवाल्याचे बांधकाम पाडले. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाने आरोपी व्यावसायिकाचे भंगारचे दुकान बुलडोझरने पाडले. शिवसेना नेते निलेश राणे यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या.
कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला.
मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस… pic.twitter.com/LK1yDPuLa6— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 24, 2025
आमदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार,’ असे निलेश राणे यांनी म्हंटले आहे.
रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये दोन लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. स्थानिक लोकांनी विरोध केल्यावर वाद सुरू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले त्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा:
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना अखेर दिलासा; RBIने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय




