Devendra Fadnavis : मंत्र्यांनी घेतलेला निर्णय फिरवता येणार; मुख्यमंत्र्यांना मिळाले नवे अधिकार; राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Devendra Fadnavis : यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे.

Devendra Fadnavis : आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम २०२६ ही अधिसूचित करण्यात आली आहे.
यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. याविषयीचे वृत्त एका न्यूज चॅनेलने दिले आहे.
नवीन निर्णयानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही महत्वाचे अधिकार घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नेमके कोणकोणते अधिकार असणार आहेत, ते खालीलप्रमाणे…
- मुख्यमंत्री कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात थेट हस्तक्षेप करु शकतात.
- सार्वजनिक हिताच्याबाबत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू शकतात.
- एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय फिरवताना मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरुपात आपली नोंद करावी लागेल.
- या नियमामुळे मुख्यमंत्री असतील, मंत्री असेल किंवा मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धतीबाबत आणि अधिकाराबाबत त्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्रं मागवू शकतात.
- संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांना ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.
महायुतीत तणावाची शक्यता
शासन कार्यपद्धती नियम २०२६ च्या नव्या नियमानुसार करण्यात आलेल्या बदलांमुळे महायुतीमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे निर्णय बदलल्यास महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयावर मित्र पक्षांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष लागले आहे.






