Sanjay Raut : ठरलं! मुंबईत उबाठाचा स्वबळाचा नारा; इतर ठिकाणी मविआसोबत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका

पिंपरी-चिंचवडः राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्याच्या निवडणुका येत्या काही महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्या संस्थाच्या निवडणुका डोळ्यांसमोर आत्तापासूनच रणनिती आणि मोर्चेबांधणीला सुरूवात करण्यात आली आहे. शिवसेना उबाठा गटाने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला असून इतर ठिकाणी मात्र मविआसोबत निवडणुकीला सामोर जाणार असल्याचे शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबईवर शिवसेना उबाठाची पकट असून मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत इतर ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मुंबईवर शिवसेनेची पकट आहे. ती टिकवण्यासाठी स्वबळावर लढावे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा अर्थ निघू शकत नाही, असे देखील राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पिंपरी चिंचवडमधील पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
शिंदेंचे हायकमांड भाजप
मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल. देशभरातील पक्ष फोडण्याची भाजपला चटक लागली आहे. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांचेही पक्ष फोडले जातील, असा घाणाघात राऊत यांनी भाजपवर केला. तसेच शिंदे यांचे हायकमांड भाजप आहे. त्यांचा आदेश शिंदे यांना पाळावा लागतो. शिंदे याच्यांकडे कोणताही पर्याय नव्हता. दाखल होणारे खटले थांबविण्यासाठीच शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याची बोचरी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.





