पुणे -डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील खाद्यपदार्थात अळ्या सापडण्याबाबत इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) कंत्राटदाराला 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पुण्यातील सागर काळे हे दि. 21 जुलै रोजी डेक्कन क्वीनमधून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी डायनिंग कारमध्ये ऑम्लेट मागविले होते. त्याबरोबर असणाऱ्या सॉस आणि मिरपुडीमध्ये त्यांना अळ्या आढळून आल्या. याबाबत त्यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी तक्रार केली होती. या प्रकरणाची आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई केली आहे.
“ब्रूनो केटरर्स’च्या कंत्राटदाराला याबाबत चांगली सेवा देण्याची ताकीद देखील दिली आहे. प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ पुरवण्याचा आमचा मानस आहे, असे आयआरसीटीसीचे सहायक व्यवस्थापक गुरूनाथ सोना म्हणाले.