Nevasa News : पिचडगावात दशकानंतर वहिवाट रस्ता खुला; नेवाश्यात शिव-पानंद चळवळीला मोठे यश!
Nevasa News : गेल्या अनेक दशकांपासून बंद असलेला आणि शेतकरी कुटुंबासाठी संघर्षाचा विषय ठरलेला वहिवाटीचा शेतरस्ता अखेर मोकळा झाला आहे.

Nevasa News : नेवासे तालुक्यातील पिचडगाव शिवारात अनेक वर्षांपासून बंद असलेला शेतकरी बाबासाहेब शिरसाठ यांचा वहिवाटीचा रस्ता अखेर खुला झाला आहे. या रस्त्यासाठी शिरसाठ कुटुंबाला गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करावा लागत होता. अखेर तहसीलदार संजय बिराजदार यांच्या आदेशानुसार आणि मंडलाधिकारी सरिता मुंडे यांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे हा रस्ता मोकळा झाला आहे. (Nevasa News)
असा सुटला वाद
तहसीलदारांच्या आदेशानंतर मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी आपल्या पथकासह थेट शेतावर जाऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिव-पानंद रस्ते चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत सकारात्मक वातावरण निर्मिती केली. (Nevasa News)
परिणामी निवृत्ती जावळे, सुभाष टिळेकर, कारभारी औताडे, महेश धिवरे, बाबासाहेब शिरसाठ, अभिषेक शिरसाठ या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने सहकार्याची भूमिका घेत स्वतःहून रस्ता खुला करून दिला रस्ता खुला झाल्याने शिरसाठ कुटुंबासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहतुकीचा मोठा प्रश्न कायमचा सुटला आहे. (Nevasa News)
या कारवाईचे वैशिष्ट्य
या रस्ता खुला करण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणताही पोलीस बंदोबस्त लावावा लागला नाही. कोणताही वाद, भांडण न होता केवळ संवाद आणि सामंजस्यातून शेतकऱ्यांनीच हा प्रश्न सोडवला. याबद्दल शेतकऱ्यांनी मंडलाधिकारी सरिता मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. (Nevasa News)
यावेळी शिव-पानंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, कार्यकर्ते कारभारी गरड, दत्तात्रय गटकळ, कानिफनाथ कदम, ज्ञानेश्वर जंगले, रमेश भक्त, रावसाहेब कडू, प्रशांत चौधरी, हरीभाऊ तुवर, मिनीनाथ घाडगे, ज्ञानेश्वर अरगडे आदी उपस्थित होते. (Nevasa News)
भानसहिवरेत १६ रस्त्यांचा श्वास मोकळा
मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आणि पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत भानसहिवरे मंडळाच्या मंडलाधिकारी सरिता मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. (Nevasa News)
त्यांनी अनेक दशके वादात बंद असलेले तब्बल १६ रस्ते खुले केले आहेत. यामध्ये ८ शिवरस्ते, १ पानंद रस्ता, ५ रस्ते कलम ५/२ नुसार तर २ रस्ते कलम १४३ नुसार खुले करण्यात आले आहेत. (Nevasa News)
Nevasa News : नेवासा शहरालगत तीन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा; एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास





