शेतीचे काम करताना मृत्यू ! 11 हजार शेतकऱ्यांना ‘या’ राज्यातील सरकारने दिली 176 कोटींची मदत

नवी दिल्ली – शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारसह अनेक सेवाभावी संस्था त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करताना दिसून येतात. मात्र शेतीचे काम करताना एखादा अपघात झाला आणि शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना अनेकदा मोठा त्रास सहन करावा लागल्याचे पाहायला मिळते. मात्र शेतीची एकमे करताना मृत्यू झाला असल्यास अशा शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे काम सध्या राजस्थान सरकारने सुरु केले आहे.
वेणीराम हे शेतकरी होते. ऑगस्ट 2022 मध्ये साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी ते त्यांच्या मक्याच्या शेतातील तण काढत होते. वेनाराम हे उदयपूर जिल्ह्यातील गिरवा येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्नी दळीबाई यांना राजस्थान सरकारने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. राजीव गांधी कृषक साथी सहयोग योजनेंतर्गत दळीबाईंना ही मदत देण्यात आली. दळीबाई एकट्या नाहीत. त्यांच्याप्रमाणेच या योजनेंतर्गत राज्यभरातील ११ हजार ७७७ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली आहे.
राजस्थान सरकारने शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना होणारी शारीरिक हानी भरून काढण्यासाठी राजीव गांधी कृषक साथी सहयोग योजना हा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेंतर्गत शेतीचे काम करत असताना अधू झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास, शेतकऱ्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. त्याच बरोबर पाठीचा कणा तुटणे, डोक्याला दुखापत झाल्याने कोमात जाणे, दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे किंवा कोणताही एक अवयव अधू झाला तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. .
आतापर्यंत 11,777 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे
या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून 11 हजार 777 शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या माध्यमातून 176 कोटी 37 लाख 68 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये डिसेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंत 989 शेतकर्यांना रु. 4303.50 लाख, 2019-20 मध्ये 2,981 शेतकर्यांना 3457.10 लाख, 2020-21 मध्ये 2275 शेतकर्यांना 3457.10 लाख, 2021-21 मध्ये 2806 शेतकर्यांना रु. 2321 शेतकरी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना 3468.80 लाख रुपये देण्यात आले आहेत.
याशिवाय एप्रिल 2023 ते मे पर्यंत 405 शेतकऱ्यांना 799.20 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी जन आधार आणि मोबाईल क्रमांकाद्वारे राज किसान साथी पोर्टलवर अर्ज पाठवू शकतात.




