मुंबई – आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. चेन्नईत ड्यूटीवर असताना बांगलादेशी धार्मिक कट्टरपंथीयांकडून कॉल आणि मेसेजद्वारे धमकी आल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. तसा ई-मेल त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गोरेगाव पोलीस ठाण्याला पाठवला आहे. याबाबत अजून तक्रार दाखल झाली नसून याचा प्राथमिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले होते. या कारवाई आणि तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली आहे.