आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी; पाळत ठेवली जात असल्याचा केला दावा…
Updated On:

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असून वारंवार धमकी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
इतकेच नाही तर एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा देखील प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला आहे.
प्रसाद लाड यांनी गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. कामगारांसाठी काम करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचेही आमदार लाड यांनी म्हटले आहे.





