‘दे धमाल’ मधील अभिनेत्याने उरकला साखरपुडा; फोटो केले शेअर

Entertainment : मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत आहे. नुकतेच अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. त्यांनी हळदी, मेहंदी आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. त्यानंतर आता बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेला अभिनेता अनुराग वरळीकरने देखील साखरपुडा उरकला आहे. पायल साळवी हिच्याशी त्याने साखरपुडा केला असून लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहे.
अनुराग आणि पायल यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ब्लॅक सूटमध्ये अनुराग खूपच हँडसम दिसत असून रॉयल ब्लू रंगाच्या वेस्टर्न गाऊनमध्ये पायल सुंदर दिसत आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत ‘कधीही न संपणाऱ्या अॅडव्हेंचरसाठी तयार’ असं त्याने कॅप्शन दिलं आहे. सध्या त्याच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
2001 साली आलेल्या ‘दे धमाल’ या मालिकेतील चिनु या पात्रामुळे तो घराघरात पोहचला होता. देवकी हा त्याचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये अलका कुबल यांच्यासोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. ‘दे धमाल’ मालिकेशिवाय त्याने ‘बारायण’, ‘मिशन चॅम्पियन, निवडुंग, ‘पोर बाजार’, ‘देवकी’ या सिनेमांमध्येही त्याने काम केले होते. यातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत तो श्वेता शिंदेच्या मुलाच्या भूमिकेत दिसला. सध्या अनुराग दिग्दर्शन क्षेत्रात काम करत आहे.





