DC vs SRH : मिचेल स्टार्कने केली कमाल! हैदराबादच्या तब्बल ‘इतक्या’ फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता

DC vs SRH Mitchell Starc bowled brilliantly and took 5 wickets : आयपीएल २०२५ च्या १० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ज्यामुळे त्यांचा संघ १८.४ षटकांत १६३ धावांवर गारद झाला. तगड्या हैदराबाद संघाला १६३ धावांवर गारद करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका मिचेल स्टार्कने बजावली. ज्याने ५ विकेट्स घेत हैदराबादच्या डावाला खिंडार पाडण्याचे काम केले.
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याच्या गोलंदाजीने धुमाकूळ घालताना स्पेलच्या दुसऱ्याच षटकात सनरायझर्स हैदराबादच्या दोन फलंदाजांना बाद करून खळबळ उडवून दिली. दिल्लीकडून डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कने पहिल्याच चेंडूवर इशान किशनला यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद केले. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनला फक्त २ धावा करता आल्या. या हंगामात सनरायझर्सकडून पदार्पणाच्या सामन्यात इशानने शानदार शतक झळकावले होते.
Innings break!
Mitchell Starc produces a spell for the ages but Aniket Verma's gritty knock propels #SRH to 1️⃣6️⃣3️⃣ 🎯
Will #DC chase this down? 💭
Updates ▶️ https://t.co/L4vEDKzthJ#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/2mzucGaWos
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
मिचेल स्टार्कच्या धारदार गोलंदाजीने वेधलं लक्ष –
Flexing Muscles ft. Mitchell Starc 💪#SRH end powerplay with 58/4
Updates ▶️ https://t.co/L4vEDKyVsb#TATAIPL | #DCvSRH | @DelhiCapitals pic.twitter.com/sOWNTH2hWF
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
इशान किशनला बाद केल्यानंतर, मिचेल स्टार्कने आपल्या कडक गोलंदाजीने सनरायझर्सचा आणखी एक स्फोटक फलंदाज नितीश कुमार रेड्डी याची विकेट्स घेतली. ईशानला बाद केल्यानंतर, स्टार्कचा दुसरा चेंडू वाईड गेला आणि केएल राहुल तो पकडू शकला नाही, ज्यामुळे हैदराबादला पाच धावा मिळाल्या. यानंतर, पुढच्या चेंडूवर स्टार्कने एकही धाव दिली नाही. त्यानंतर त्याने खाते उघडण्यासाठी संघर्ष करत असणाऱ्या नितीश कुमार रेड्डीला बाद केले, तो स्टार्कच्या फुल लेन्थ चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या कर्णधार अक्षर पटेलच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे रेड्डी खाते न उघडताच बाद झाला.
स्टार्कसमोर ट्रॅव्हिस हेडही ठरला अपयशी –
Mitchell Starc against Travis Head in IPL:
Balls – 7
Runs – 10
Wickets – 2
Average – 5.0– STARC, THE VERY BEST. 🫡 pic.twitter.com/1zNsgX8qVQ
— Tanuj (@ImTanujSingh) March 30, 2025
इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी यांना बाद केल्यानंतर, मिचेल स्टार्कच्या गळाला ट्रॅव्हिस हेडही लागला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला ट्रॅव्हिस सुरुवातीपासूनच फलंदाजी करताना अस्वस्थ दिसत होता. सतत प्रयत्न करूनही त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. अशा परिस्थितीत त्याने मिचेल स्टार्कच्या षटकात धोका पत्करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो यशस्वी झाला नाही. १२ चेंडूत २२ धावा काढल्यानंतर मिशेल स्टार्कने ट्रॅव्हिस हेडला झेलबाद केले.
हेही वाचा – GT vs MI : लाईव्ह सामन्यात आशिष नेहराचा का चढला पारा? गुजरातच्या फलंदाजांवर संतापल्याचा VIDEO व्हायरल
यानंतर मिचेल स्टार्कने १९ व्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलला कर्णधार अक्षर पटेलच्या हाती झेलबाद केले. तो फक्त ५ धावा करु शकला. त्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने आन मुल्डरला झेलबाद केले. त्याचा झेल दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार फाफ डू प्लेसिसने घेतला. ज्यामुळे त्याची खेळी ९ धावांत संपुष्टात आली. अशा प्रकारे मिचेल स्टार्कने ३.४ षटकाचा आग ओकणारा स्पेल टाकत ३५ धावा खर्च करत ५ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.





