DC vs RR : शार्दुल ठाकूर पाठोपाठ संदीप शर्माचा कहर! एकाच षटकात टाकले तब्बल ‘इतके’ वाईड

DC vs RR Sandeep Sharma bowls 4 wides in one over : आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास आतापर्यंत चढ-उतारांनी भरलेला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाला विजयांपेक्षा जास्त पराभवांचा सामना करावा लागला आहे. संघातील सर्व खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता खेळाडू त्याच्या कामगिरीने निराश करतोय. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा अनुभवी गोलंदाज संदीप शर्माचीही अशीच परिस्थिती होती, ज्याने एकाच षटकात अनेक चेंडू वाईड टाकले.
या सामन्यात राजस्थान संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आला. या सामन्यात दिल्लीच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना मोठी आणि वेगवान खेळी खेळण्यात अपयश आले. मधल्या षटकांमध्ये काही धावा झटपट आल्या तरी राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीला नियंत्रणात ठेवले. संदीपने यात चांगली भूमिका बजावली आणि ३ षटकांत फक्त १४ धावा दिल्या. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या फलंदाजांना जास्त धावा जाऊ नयेत म्हणून शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी त्याचाकडे सोपवली होती.
संदीप शर्माने वाईडचा केला कहर –
Four wides, one no-ball, one four, one six!
Quite a long last over from Sandeep Sharma!!
📸: JioHotstar#SandeepSharma #TristanStubbs #AshutoshSharma #DCvsRR #DCvRR #IPL2025 #IPL #TATAIPL #Cricket #SBM pic.twitter.com/bVj0mrIomH
— SBM Cricket (@Sbettingmarkets) April 16, 2025
आतार्यंतच्या संदीपच्या कामगिरीचा विचार करता हा निर्णय चुकीचा नव्हता. पण हे षटक सुरू होताच संदीप गोलंदाजी कशी करायची हे विसरला असे वाटले. या गोलंदाजाने षटकाची सुरुवात वाइड चेंडूनी केली. मग पुढचा चेंडू बरोबर होता आणि त्यावर एकही धाव दिली गेली नाही. पण पुन्हा एकदा त्याची लय बिघडली आणि त्याने पुढचे सलग ३ चेंडू वाईड टाकले. मग पुढचा चेंडू त्याच्या स्टंपच्या लाईनवर होता आणि त्यावर फक्त एकच धाव आली पण यामध्ये त्याने क्रीजची सीमा ओलांडली आणि तो नो-बॉल देण्यात आला. पंचांनी नो-बॉल घोषित करताच राजस्थानचे प्रशिक्षक राहुल द्रविडही नाराज झाले आणि त्यांनी निराशा व्यक्त करण्यास सुरुवात केली. याआधी शार्दुल ठाकूरने एका षटकात पाच वाईड टाकले होते.
हेही वाचा –DC vs RR : संजू सॅमसनने केला खास पराक्रम! केएल राहुलला टाकले मागे
सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला १८९ धावांचे लक्ष्य दिले. दिल्लीकडून अभिषेक पोरेलने ४९ धावांची खेळी केली. केएल राहुलने ३८ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी ३४-३४ धावांची स्फोटक खेळी केली. दिल्लीने शेवटच्या ५ षटकांत ७७ धावा केल्या. ज्याच्या मदतीने दिल्लीने २० षटकांत ५ गडी गमावून १८८ धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. महेश तीक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.





