DC vs MI : मुंबईनं मारलं दिल्लीचं मैदान! उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर रोखला राजधानीचा विजयरथ

DC vs MI Mumbai Indians beat Delhi Capitals by 12 runs : मुंबई इंडियन्सने देशाच्या राजधानीत येऊन आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम दिला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या संघाने दिल्लीचा १२ धावांनी पराभव केला. यासह दिल्लीचा विजयरथ रोखला. यंदाच्या हंगामातील हा दिल्लीचा पहिलाच पराभव ठरला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ १९ षटकांत १९३ धावांत गारद झाला.
या हंगामातील पहिला सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला आणि यजमान दिल्ली कॅपिटल्सला सलग पाचवा सामना जिंकण्याची संधी होती. एकेकाळी अक्षर पटेलचा संघ जिंकण्याच्या स्थितीत दिसत होता पण बेजबाबदारपणामुळे त्यांना सामना गमवावा लागला. १९ व्या षटकात सलग तीन धावबाद झाल्याने, दिल्लीने त्यांच्या हातात असलेला सामना गमावला. या हंगामात दिल्लीचा हा पहिलाच पराभव आहे.
𝘝𝘪𝘤𝘵𝘰𝘳𝘺 𝘵𝘢𝘴𝘵𝘦𝘴 𝘴𝘸𝘦𝘦𝘵𝘦𝘳 𝘸𝘩𝘦𝘯 𝘪𝘵’𝘴 𝘵𝘩𝘪𝘴 𝘤𝘭𝘰𝘴𝘦! 💙
3⃣ run-outs, high drama and #MI walk away with a thrilling win to break #DC's unbeaten run 👊
Scorecard ▶ https://t.co/sp4ar866UD#TATAIPL | #DCvMI | @mipaltan pic.twitter.com/q9wvt5yqoe
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
दिल्लीच्या फलंदाजांना बेजबाबदारपण नडला –
An over that we won't get over 🤌😅#MI hold their nerves to seal victory with a hat-trick of runouts 💪
Scorecard ▶ https://t.co/sp4ar86EKb#TATAIPL | #DCvMI | @mipaltan pic.twitter.com/BpBwpbxPh8
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आणि २०६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि १५ व्या षटकापर्यंत ते जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे दिसत होते. पण शेवटच्या ४ षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळून मुंबईला पुनरागमनाची संधी दिली आणि नंतर सामना गमावला. याचे सर्वात मोठे उदाहरण १९ व्या षटकात दिसले, जेव्हा संघाला ९ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे ३ विकेट्स शिल्लक होत्या, पण शेवटचे ३ फलंदाज सलग ३ चेंडूत धावबाद झाले.
हेही वाचा – DC vs MI : रोहितचा ऐतिहासिक विक्रम! धोनीला मागे टाकत दिल्लीविरुद्ध केला मोठा पराक्रम
तिलक-नमनची दमदार फलंदाजी –
पण परिस्थिती या टप्प्यावर कशी पोहोचली, हे पहिल्यांदा जाणून घेऊया. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २०५ धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. त्यांच्याकडून, तिलक वर्मा (३३ चेंडूत ५९) ने आणखी एक जलद अर्धशतक झळकावले तर नमन धीर (१७ चेंडूत ३८) ने पुन्हा एकदा शेवटच्या षटकांमध्ये धावा फटकावल्या. दोघांनी मिळून फक्त ३३ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. यापूर्वी, सूर्यकुमार यादव (४०) आणि रायन रिकेल्टन (४१) यांनीही प्रभावी योगदान दिले. दुसरीकडे, कुलदीप यादव पुन्हा एकदा दिल्लीसाठी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आणि त्याने फक्त २३ धावांत दोन २ मोठ्या विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – RR vs RCB : ‘मला माहित होते की….’, सॅमसनने स्वतः सांगितले की आरसीबीने कुठे मारली बाजी?
करुण नायरच्या खेळीवर फेरले पाणी –
यानंतर, दिल्लीने पहिल्याच चेंडूवर जेक-फ्रेसर मॅकगर्कची विकेट गमावली. पण इथे इम्पॅक्ट सब्सिटिटिव्ह करुण नायर (८९ धावा, ४० चेंडू, १२ चौकार, ५ षटकार) होता, जो ३ वर्षांनी आयपीएल सामना खेळत होता. हा फलंदाज येताच त्याने गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली आणि जसप्रीत बुमराहला त्याचे सर्वात मोठे लक्ष्य बनवले. त्याने बुमराहविरुद्ध फक्त ९ चेंडूत २६ धावा केल्या, ज्यात २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. तथापि, सँटनरच्या एका शानदार चेंडूने तो त्रिफळाचित झाल्याने त्याचे शतक हुकले. १२ व्या षटकापर्यंत, करुणने दिल्लीला १४० धावांच्या जवळ आणले होते. शेवटी दिल्लीच्या पराभवाने त्याच्या खेळीवर पाणी फेरले.





