पुण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये “प्रभात फेरी’
Updated On:

कात्रज, दि. 11 (प्रतिनिधी) -भारती विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
समाजामध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम जागृत व्हावे तसेच प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी व स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यालयातील 5 वी ते 12 अखेर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, हम सब एक है, एक कदम स्वच्छता की ओर, स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणा देत भारती विद्यापीठ परिसर, चंद्रभागा नगर, त्रिमूर्ती चौक, आंबेगाव पठार या भागातून प्रभात फेरी काढली.
विद्यालयाचे प्राचार्य विकास आबदर व उपप्राचार्या वर्षा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.





