दाऊदच्या माजी साथीदाराला खंडणी प्रकरणात अटक
Updated On:

मुंबई : दाऊदचा माजी साथीदार तारीक परवीन याला आज दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात अटक करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणात पोलिसांनी दाऊदचा साथीदार एजाज लकडावाला आणि सलीम फर्नीचरवाला याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे दोघेही सध्या कारागृहात आहेत. लकडावाला आणि फर्नीचरवाला हे दक्षिण मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. त्यांच्या या रॅकेट मध्ये तारीक परवीन याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.





