Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘येथून पुढे मी…’

डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय –
ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अहमदाबाद विमान अपघाताबाबत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या घटनेला दुखद म्हटले आहे. त्याने सांगितले की, त्याचा संपूर्ण कुटुंबाला एअर इंडियाने प्रवास करण्याचा विचार होता, परंतु आता तो कधीही एअर इंडियाने प्रवास करणार नाही, असा निर्णय त्याने घेतला आहे.
एअर इंडियाच्या माजी क्रू मेंबरच्या गंभीर आरोपाने खळबळ –
Instagram story Of David Warner For Air India #planecrash #AhmedabadPlaneCrash #Ahmedabad #DavidWarner pic.twitter.com/d1j3aUcMLE
— TusH (@TushS07) June 13, 2025
एअर इंडियाच्या माजी क्रू मेंबरच्या गंभीर आरोपाने खळबळ माजली आहे. या माजी कर्मचाऱ्याने खराब विमानांचा सातत्याने वापर केला जात असल्याचा दावा केला होता. याच संदर्भात डेव्हिड वॉर्नरने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने बोइंगचे आणखी एक विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती दिली. निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळून नफा कमावणे अत्यंत लज्जास्पद आहे, असेही वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
हेही वाचा – NED vs SCO : नेदरलँड्सचा ऐतिहासिक विजय; स्कॉटलंडचा धुव्वा उडवत मोडला भारताचा १२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
डेव्हिड वॉर्नरची क्रिकेट कारकीर्द –
डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी १५ वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याने ११२ वनडे, १६२ कसोटी आणि ११० टी-२० सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने या तिन्ही प्रकारांत मिळून १८,००० हून अधिक धावा केल्या आहेत. या सलामी फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके ठोकली, यात २६ कसोटी, २२ वनडे आणि १ टी-२० शतकाचा समावेश आहे.आयपीएलमध्येही डेव्हिड वॉर्नरचे नाव यशस्वी फलंदाजांपैकी आहे. तो आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू आहे. त्याने १८४ सामन्यांत ६,५६५ धावा केल्या, यात त्याची सर्वोच्च धावासंख्या १२६ धावां आहे.






