David Warner Record : डेव्हिड वॉर्नरचा धमाका! तुफानी शतक झळकावत विराट कोहलीचा मोडला विक्रम

David Warner broke Virat Kohli Record : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी बॅटमधील त्याची धार अजूनही कायम आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) शुक्रवारी सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळताना वॉर्नरने स्फोटक शतक झळकावत नवा इतिहास रचला. या शतकी खेळीसह त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एका विशेष विक्रमात मागे टाकले आहे.
वॉर्नरने कोहलीचा मोडला विक्रम –
टी-२० क्रिकेटमध्ये (आंतरराष्ट्रीय आणि लीग मिळून) डेव्हिड वॉर्नरचे हे १० वे शतक ठरले आहे. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या ९ शतकांचा विक्रम मोडला. टी-२० मध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे खेळाडू:
१. ख्रिस गेल: २२ शतके
२. बाबर आझम: ११ शतके
३. डेव्हिड वॉर्नर: १० शतके
४. विराट कोहली: ९ शतके
कॅप्टन वॉर्नरचा नाबाद ‘वन मॅन शो’ –
🔥 WARNER UNSTOPPABLE IN BBL! 🔥
💯 David Warner once again reaches three figures
Second Century in the 2026 season#DavidWarner #BBL2026 pic.twitter.com/v2IbSBBx4L— Cric Insights (@cricinsights1) January 16, 2026
सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात वॉर्नरच्या सिडनी थंडर्स संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. एका टोकाकडून विकेट्स पडत असतानाही वॉर्नरने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्याने अवघ्या ६५ चेंडूंमध्ये नाबाद ११० धावा कुटल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. वॉर्नरच्या या खेळीच्या जोरावर सिडनी थंडर्सने २० षटकांत १८९ धावांचा डोंगर उभा केला.
हेही वाचा – UPW vs MI : हरलीन देओलचं वादळ! यूपी वॉरियर्सचा मुंबईवर दणदणीत विजय; सलग ३ पराभवांनंतर उघडलं विजयाचं खातं
२०२६ मधील दुसरे शतक –
२०२६ हे वर्ष डेव्हिड वॉर्नरसाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. या वर्षातील त्याचे हे दुसरे शतक आहे. तसेच बिग बॅश लीगच्या इतिहासातील हे त्याचे तिसरे शतक ठरले. बीबीएलमध्ये आतापर्यंत केवळ बेन मॅकडरमॉट, स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या तिघांनाच ३-३ शतके झळकावता आली आहेत.





