#IPL2021 | वॉर्नरला मिळाली अपमानास्पद वागणूक
Updated On:

दुबई – सनरायझर्स हैदराबादला कधीकाळी विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरलेला कर्णधार व सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला संघातून तसेच संघ मालकांकडून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
हैदराबाद संघ व्यवस्थापनाने मात्र, हे वृत्त फेटाळले असले तरीही स्पर्धेतील आव्हान संपल्यावर संघाच्या निरोपाच्या व्हिडीओतही वॉर्नरला स्थान देण्यात आले नसल्याने चर्चील्या जात असलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचेही दिसून येत आहे.
हैदराबादने यंदाच्या स्पर्धेत खेळलेल्या 14 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले. यंदाच्या स्पर्धेत वार्नर सातत्याने अपयशी ठरला. यानंतर त्याला अनेक सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नव्हते.





