‘थिएटरमध्ये या आणि स्वत:ची लायकी दाखवा’, ‘या’ दिंग्दर्शकाने ओटीटी कलाकारांना दिले थेट आव्हान

मुंबई : आजच्या तारखेला ओटीटी हे मनोरंजनाच्या माध्यमांपैकी एक माध्यम बनले आहे. अनेक मोठे कलाकार त्यांच्या अभिनयासाठी हल्ली ओटीटीचं माध्यम निवडताना दिसत आहेत. काही कलाकार ओटीटीच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचीही बरीच पसंती हल्ली ओटीटी माध्यमांना मिळताना दिसत आहे. या सगळ्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
काय म्हणाले डेविड धवन?
डेविड धवन यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अरबाज खान याला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी अरबाजने ओटीटी माध्यमामुळे सिनेमांचा प्रभाव थोडा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर डेविन यांनी उत्तर देताना म्हटलं की, ओटीटीवर कुणीही करेल, पण खरी परीक्षा ही थिएटरमध्येच असते.
तसेच ते पुढे म्हणाले ओटीटीमुळे सिनेमांचा प्रभाव अजिबात कमी झालेला नाही. जे कलाकार ओटीटीवर काम करतात त्यांनी थिएटरमध्ये यावं आणि स्वत:ची लायकी दाखवावी. ओटीटीवरील कलाकार हे थिएटरमधील सिनेमे करु शकणार नाही. कारण शेवटी तुमचं खरं कौतुक हे तिथेच होतं. तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुम्हाला स्वत:हून पाहायला मिळते. तो टाळ्यांचा कडकडाट अनुभवता येतो आणि याहूनच मोठी गोष्ट कोणतीही नाही. ही प्रतिक्रिया तुम्हाला ओटीटीवर कधीच मिळणार नाही.





